पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे
उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- लक्ष्मण कांबळे
उदगीर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,उदगीर तालुका कार्यालयाचे उद्घघाटन दि.१८/११/२०२० रोजी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोविड काळात जीवाची पर्वा न करता घराघरात बातमी पोहचविणा-या पत्रकारांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रभर लढा उभा करून पत्रकारांचे कल्याण, उत्कर्ष व उन्नतीसाठीच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ कार्य करीत असून महाराष्ट्रातील संघाच्या पत्रकारांवर कोणी हल्ला किंवा अन्याय करण्याचा प्रयत्न करीत असेल तर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ कदापिही गय करणार नाही असा संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी इशारा दिला आहे. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनंत पाटील, जिल्हा सरचिटणीस अर्जून जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुतार, तालुकाध्यक्ष सुधाकर नाईक, पत्रकार सोनी, कायदेविषयक सल्लागार अॅड.डाॅ. श्रवणकुमार माने, अॅड. जयवर्धन भाले, उदगीर शहराध्यक्ष विश्वनाथ गायकवाड, पत्रकार बसवेश्वर डावळे, शहर उपाध्यक्ष संग्राम पवार, ग्रामीण सचिव अनंत कांबळे, तालुका संपर्क प्रमुख राम जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू किणीकर, तालुका सचिव प्रविण सुर्यवंशी, उदगीर शहर संपर्क प्रमुख नागनाथ गुट्टे, संघाचे पदाधिकारी पत्रकार अनिल जाधव, पत्रकार जीवन भोसले, पत्रकार विलास वाघमारे, देवणी तालुकाध्यक्ष पत्रकार लक्ष्मण कांबळे, पत्रकार नरसिंग सुर्यवंशी, पत्रकार प्रविण माने, पत्रकार शेख अझरोद्दीन आदी पदाधिका-यांना कोविड योद्धाने गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अर्जून जाधव, कायदेविषयक सल्लागार अॅड.डाॅ. श्रवणकुमार माने, अॅड. जयवर्धन भाले, पत्रकार सोनी यांनी मनोगत व शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक अनंत पाटील तर आभार लक्ष्मण रणदिवे यांनी मानले याप्रसंगी बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते.