प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित


महाराष्ट्र २४ आवाज



प्रतिनिधी-भगवान धनगे


जालना : प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या जालना जिल्हा शाखेच्या वतीने दि.१/११/२०२० रोजी महाराष्ट्राचे विद्यमान आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे यांना कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जालना जिल्ह्यातील अंबड येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जालना जिल्हाध्यक्ष व पत्रकार भगवान धनगे यांच्या पुढाकाराने संस्थापक अध्यक्ष डी.टी आंबेगावे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला. कोवीड १९ आपत्तीमध्ये पोलीस प्रशासन,आरोग्य प्रशासन, पत्रकार संघटना सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तीसह विविध स्तरांवर केलेल्या सामाजिक बांधिलकीचा सन्मान व्हावा या उद्देशाने कोरोना नियमांचे पालन करून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे यांना 'कोविड योद्धा' सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जालना जिल्हाध्यक्ष भगवान धनगे, उपाध्यक्ष तनविर बागवान, संघाचे पदाधिकारी, उपसंपादक श्री जगन्नाथ जाधव, पत्रकार दत्ता भोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी दैनिक साहित्य सम्राट या वर्तमानपत्राचे डॅशिंग पत्रकार महादेव(अप्पा) लोखंडे यांची निवड
Image