सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी 


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


 मुंबई : कोरोनामुळे देशभरासह महाराष्ट्रात वृत्तपत्र चालविणे अत्यंत कठीण झाले असून काही वृत्तपत्र तर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ जीवंत ठेवण्यासाठी दिपावली निमित्त सर्व वृत्तपत्रांना विनाअट सरसकट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे लघु-मध्यम व साप्ताहिक वृत्तपत्र चालविण्यासाठी लागणारा खर्च संपादक व मालकांना सध्या परवडत नसून ज्या वृत्तपत्रांने आर.एन.आय. कडे नोंदणी केलेली आहे अशा सर्व वृत्तपत्रांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिपावली निमित्त विनाअट सरसकट शासकीय जाहिरात देऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला पाठबळ द्यावे. कोरोना काळात जनता व शासनांचा दूवा म्हणून वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका बजावलेली असून जीवाची पर्वा न करता पत्रकारांनी कोरोनाच्या बातम्या संकलित करून जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. कोरोना काळात बातमी संकलित करीत असतांना काही पत्रकारांनी अक्षरशः जीव गमावला आहे त्या पत्रकारांचा विचार झाला पाहिजे, शासनांने वेळोवेळी पत्रकार व वृत्तपत्रांच्या समस्या जाणून घेणे काळाची गरज आहे तर शासन व जनतेचा दूवा म्हणून काम करणा-या पत्रकारांकडे विशेष लक्ष देण्याची मागणीही करण्यात आली आहे.


Popular posts
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी दैनिक साहित्य सम्राट या वर्तमानपत्राचे डॅशिंग पत्रकार महादेव(अप्पा) लोखंडे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
सौ.अक्षरा कदम दुस-यांदा तळा पंचायत समितीच्या सभापती
Image